रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी अशोक दुधे

रायगडचे एसपी बदलले!

अनिल पारस्कर यांची बदली अशोक दुधे नवे पोलीस अधीक्षक



प्रतिनिधी 

          रायगड : राज्य सरकारने आज तीन जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्या केल्य आहेत. त्यात रायगडचे अनिल पारस्कर यांची बदली करून तेथे अशोक दुधे यांना नेमले आहे. रायगड जिल्ह्यासाठी अधिकाऱ्यांत रस्सीखेच होती. रायगडचे एसपी पारस्कर यांचा तीन वर्षांहून अधिक कालावधी झाल्याने त्यांच्या पदावर येण्यासाठी अनेकांनी तयारी केली होती. त्याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांचेही नेते आपापल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळे या जिल्ह्याबाबत निर्णय होण्यास विलंब लागत होता. त्यातही रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेते आपण शिफारस केलेल्या नावासाठी आग्रही होते. 

        रायगडहून बदली झालेले पारस्कर यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश नंतर काढण्यात येणार आहेत. राज्यातील जवळपास 25 हून अधिक आयपीएस अधिकारी नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. आज काढलेल्या आदेशात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांची अमळनेर विभागातून जळगाव उपविभागात बदली झाली आहे. जळगावचे उपविभागीय अधिकारी प्रशिक्षणार्थी नीलम रोहन यांची नियुक्ती प्रतिक्षेत ठेवली आहे. 

Comments