घरबैठे आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

घरबैठे आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद



घन:श्याम कडू

           उरण : तालुक्याला मंजूर झालेल्या जागेवर हॉस्पिटल तातडीने उभारण्यात यावे या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधत आज २ ऑक्टोबर रोजी घरबैठे आंदोलन केले. या आंदोलनाला उरणकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. 

           उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि तत्कालीन आमदार विवेक पाटील व मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे उरण तालुक्याला उपजिल्हा हॉस्पिटलसाठी प्लॉट नंबर १, सेक्टर १५ ए, द्रोणागिरी उरण येथे ५९८३ चौमी भूखंड २०१३ साली मंजूर झाला आहे. त्याला ६ वर्षांचा अवधी उलटूनही अद्याप कामाला सुरुवात नाही. सदर हॉस्पिटल असते तर आजच्या कोरोनाच्या महामारीत उरणकरांचे प्राण वाचून उपचारही उरणमध्येच झाले असते. मंजूर झालेल्या ठिकाणी हॉस्पिटलचे काम त्वरित सुरू व्हावे यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज सकाळी ११ ते १२ या दरम्यान १ तासाचे समस्त उरणच्या जनतेने घरबैठे आंदोलन केले.

          


       उरणकरांसाठी सुसज्ज हॉस्पिटल झालेच पाहिजे अशा प्रकारचे बॅनर हातात घेऊन लहान थोरांपासून अनेकांनी आपल्या घरातूनच ही मागणी लावून धरली. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. अनेक मोठे मोठे प्रकल्प कार्यरत आहेत. मात्र उरणकरांच्या समस्यां आजही प्रलंबित आहेत. वाढत्या औद्योगिकारणामुळे लोकवस्तीही वाढली आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. परंतु या ठिकाणी मंजूर झालेले हॉस्पिटल आजही उभे राहू नसल्याने अनेकांना उपचारा अभावी जीव गमवावा लागला आहे. तरी उरणकरांच्या सेवेसाठी मंजूर झालेल्या हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठीच घरबैठे आंदोलन आज करण्यात आले आहे. यामुळे तरी शासनाला जाग येऊन हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर सुरू होईल असा विश्वास या आंदोलन प्रसंगी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.



Comments