कर्जतमधील मटका बंद करण्याची मागणी
वार्ताहर
नेरळ : कर्जत शहरात राजरोजपणे मटका-जुगार तसेच अवैध दारू विक्री सुरु आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तसेच ते बंद झाले पाहिजे अशी मागणी महिला नारीशक्ती संघटनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले.
कर्जत शहरातील पाटील आळी, खाटीक आळी असे दोन ठिकाणी तर फातिमा नगर भिसेगाव, गुंडगे आणि दहिवलीमध्ये काही ठिकाणी खुलेआम मटका-जुगार खेळाला जात आहे. याबाबत पोलिसांनी अनेकांनी निवेदने देऊन देखील पोलिस याकडे कानडोळा करताना दिसत आहे.
कर्जत पोलिसांना निवेदन देतेवेेेळी नारीशक्ती संघटनेच्या स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे, अर्चना हगवणे, ज्योती जाधव, कमल जाधव, वर्षा डेरवणकर, आशा गाडे, मालती वाडगावकर, सीताराम गाडे आदी महिला उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment