शासनमान्य संगणक टायपिंग शिक्षण संस्था सुरू करण्यास अखेरीस प्रशासनाची परवानगी

शासनमान्य संगणक टायपिंग शिक्षण संस्था सुरू करण्यास अखेरीस प्रशासनाची परवानगी

आ. अनिकेत तटकरे यांच्या पुढाकाराबद्दल संस्थेतर्फे व्यक्त केले आभार



वार्ताहर

        रोहा : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जवळजवळ  गेले सात महिने पूर्णपणे बंद असलेल्या रायगड जिल्ह्यातील शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था सुरू करण्यास अखेरीस प्रशासनाने सात ऑक्टोबर रोजी परवानगी दिली.

        


        जवळजवळ सात महिने संस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे संस्थाचालकांना खुप मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. संपूर्ण राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यानंतर अनेक उद्योगव्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतरही कॉम्पुटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी मिळत नव्हती रायगड जिल्ह्यातील 43 सभासदांचे यामुळे मोठे नुकसान होत होते. दिनांक 26 सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था रायगडचे अध्यक्ष पंकज ठाकूर,सचिव राजेश श्रीवर्धनकर यांनी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांची भेट घेतली होती व त्यांना संस्था सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळावी यासाठी आर्जव केले होते त्यांनी लगेचच या प्रश्नी जातीने लक्ष घालून निवासी जिल्हाधिकारी यांना संपर्क करुन या संस्था सुरू करण्याच्या द्रुष्टीने उचित कार्यवाही करण्यास सांगितले. दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने या संस्थाचालकांना परवानगी दिली असून कोव्हिड 19 च्या सर्व प्रचलित नियमांचे पालन करून या संस्था आता प्रशिक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत.

          या विषयी लक्ष घालून संस्था चालकांना प्रशासनाकडून संस्था चालू करण्याची परवानगी मिळवून दिल्याबद्दल रायगड जिल्हा कॉम्पुटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्थेतर्फे आ. अनिकेत तटकरे व त्यांचे सहकारी उमेश लोखंडे, अजय लोटणकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Comments