जेएनपीटी बंदरातील कामगार महिलेचा मृत्यू
वार्ताहर
जेएनपीटी : जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणाऱ्या जेएनपीटी बंदरातील कामगार महिला सुरेखा अविनाश केणी (४६) यांचा चक्कर येऊन जमिनीवर पडल्याने मूत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२० रोजी वसाहती मधिल राहत्या घरी घडली आहे. या संदर्भात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात पोलीस नोंद करण्यात आली आहे.
जेएनपीटी बंदरात महिला कामगार म्हणून काम करणाऱ्या सुरेखा केणी या जासई ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी होत्या. त्यांचा विवाह चिरनेर गावातील अविनाश केणी यांच्या बरोबर २० वर्षा पूर्वी झाला होता. शांत, प्रेमळ स्वभावाने सुरेखा केणी या जासई, चिरनेर तसेच जेएनपीटी बंदरात ओळखल्या जात होत्या. बुधवारी ( दि. २१) सकाळी ठिक ७-३०च्या सुमारास त्या नेहमी प्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी घरातील कामकाज आवरण्यासाठी मग्न असताना त्यांना अचानक चक्क आल्याने त्या खाली पडल्या. त्याच्या नातेवाईक मित्र मंडळीनी सुरेखा यांना तात्काळ जेएनपीटी वसाहती मधिल रुग्णालयात तसेच पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.
सुरेखा केणी यांच्या निधनाची बातमी कळताच जासई, चिरनेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जेएनपीटी वसाहत मध्ये, जेएनपीटी बंदरातील कामगार वर्गात शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment