महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेतर्फे अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या १० हजार वाहनांवर कारवाई

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेतर्फे अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या १० हजार वाहनांवर कारवाई 

वाहनचालकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन


वार्ताहर 
        पनवेल : महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणा-या अपघातांचे मुख्य कारण वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर कसली आहे.

      अप्पर पोलीस महासंचालक भुषण उपाध्याय यांचे आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत माहे सप्टेंबर 2020 मध्ये इंटरसेप्टर वाहनादवारे व मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणा-या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली व सीट बेल्ट न लावणे , मोबाईल संभाषण, रिफलेक्टर नसलेल्या 8010 वाहनांवर अशा एकुण 18125 वाहनांवर कारवाई करण्यात आली. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडुन अपघात कमी व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुक नियमनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेळोवेळी चौकसभा आयोजीत करुन वाहन पर्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मीनल, येथे कार्यकम घेवुन वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची पत्रके वाटण्यात येतात तसेच नियंमांचे उल्लंघन केल्यामुळे होणार्‍या अपघाताबाबत माहिती देवुन अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात येतात. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार्‍या दंडात्मक कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.

Comments