ना. आदितीताई तटकरे यांनी दिली येवले अमृततुल्य दालनास भेट

ना. आदितीताई तटकरे यांनी दिली येवले अमृततुल्य दालनास भेट

मयुर दिवेकर यांचे केले विशेष कौतुक


वार्ताहर

         रोहा : शहरात नव्याने सुरू झालेल्या व संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आपल्या वैशिष्ट्यपुर्ण चवीमुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या येवले अमृततुल्य दालनास रविवारी रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी भेट देवून तेथील व्यवस्थेचे व प्रशस्त दालनाचे विशेष कौतुक केले .येवले अमृततुल्य रोहा शाखेतील चहाची गुणवत्ता व दुकानातील स्वछता याचे त्यांनी विशेष कौतुक केले. रोहे अष्टमी नगरपरिषदेचे गटनेते मयूर दिवेकर यांनी रोहेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. आदितीताई तटकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

       यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक अहमदशेठ दर्जि, राजेंद्र जैन, महेंद्र गुजर, मजीद पठाण, अमित उकडे, अजय खोत आदी मान्यवर उपस्थित होते. येवले अमृततुल्य रोहा केंद्र संचालक तथा पालिकेचे गटनेते मयुर दिवेकर यांनी रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांचे यथोचित स्वागत व सन्मान केला.

Comments