ठेकेदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पाली पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
वार्ताहर
पाली : येथील एका ठेकेदाराने त्याच्याकडे काम करणार्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पाली पोलीसांनी ठेकेदाराला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात बलात्कार आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाली तालुक्यातील एक १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी गावातील नितीन महादू पाटील या ठेकेदाराकडे मजूरी करत होती. १ जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२० यादरम्यान त्याने पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत आणि पालघर तालुक्यातील डहाणू, चरी गावठाण या ठिकाणी नेवून तीच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याचीही धमकी देत जातीवाचक शिव्या दिल्या.
याबाबत सदर मुलीने गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रात्री साडेअकरा वाजता पाली पोलीस स्थानकात ठेकेदारविरोधात तक्रार केल्यानंतर पोलीसांनी बलात्कार व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत
Comments
Post a Comment