आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेढा ग्रा. पं. तर्फे दिव्यांगांना मदतीचा हात
वार्ताहर
खांब-रोहे : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रिय युवा आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेढा ग्रामपंचायततर्फे दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी १००० रुपयांचा धनादेश प्रदान करीत पर्यावरण पूरक समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या सामना करत असताना अनेकांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाल्याने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेढा विभाग यांच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना धान्य, मास्क वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती लक्ष्मण महाले, मेढा ग्रा.पं.सरपंच स्नेहा खैरे, युवा नेते मयुर खैरे, चेअरमन.भगवान गोवर्धने, उपसरपंच नम्रता सुतार, तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य उदय मोरे, रविंद्र जाधव, माजी सरपंच विलास उंबरे, ज्ञानदेव शेलार, संतोष सुतार, ग्रामपंचायत सदस्या नम्रता महाले, शेवंती शीद, सदस्य जगदीश घरट, सदस्या श्रेजल उंबरे, ज्ञानेश्वरी गोवर्धने, समिधा जवके, ग्रामसेवक अमोल तांबडे, नथुराम महाले, जितेंद्र जाधव, विजय मोरे, संतोष जवके, चंद्रकांत गोवर्धने, नरेश शिद, शुभम उंबरे, छगन लाड यांच्या समवेत उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सभापती लक्ष्मण महाले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन अमोल तांबडे यांनी तर आभार उदय मोरे मानले.
Comments
Post a Comment