भाटे वाचनालयातर्फे डॉ. अब्दुल कलाम यांना अभिवादन
रोहा : रोह्याची साहित्य पंढरी असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्म्रुतीस व कार्यास अभिवादन करण्यात आले.
१५ ऑक्टोबर हा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गेले साडेसहा महिने बंद असलेली वाचनालये शासकीय आदेश प्राप्त झाल्यानंतर कालपासून पुन्हा सुरू झाली.
वाचनालय सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाचन प्रेरणा दिन असल्याने भाटे वाचनालयातर्फे डॉ. कलाम यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे, संचालक नितीन प्रधान, राजेश देशमुख, माजी संचालक निखिल दाते, शहरातील प्रतिथयश साहित्यिक सौ. मानसी चापेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment