रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे उपजिल्हा रुग्णालयात पीपीई किट, मास्क व सेनिटायझरचे वाटप
वार्ताहर
रोहा : शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे, डिस्ट्रिक्ट एजीए गणेश सरदार यांच्या विशेष योगदानातून व रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर यांच्या उपस्थितीत आपत्ती प्रतिसाद अनुदान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय रोहा येथील कोव्हिड केअर सेंटर व प्रार्थमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी, कोकबन येथील डॉक्टर्स व तंत्रज्ञ यांच्यासाठी पीपीई कीटस, एन. 95 मास्क, सेनिटायझरचे वाटप करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधिक्षक डॉ. अंकिता खैरकर, डॉ. अभय ससाणे, डॉ. अमित पाटील यांच्याकडे सदर साहित्य यावेळी सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब रोहा सेंट्रल अध्यक्ष महेंद्र दिवेकर, सेक्रेटरी सुचित पाटील, डिस्ट्रिक्ट एजीए गणेश सरदार, डिस्ट्रिक्ट कल्चरल हेड राकेश कागडा, क्लब डायरेक्टर रूपेश पाटील, निखिल दाते, रूपेश कर्णेकर आदी सदस्य उपस्थित होते.
रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला सातत्याने मिळत असलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल डॉ. अंकिता खैरकर यांनी हॉस्पिटल प्रशासनातर्फे क्लब प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर व सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment