न्हावा-शिवडी सिलिंक प्रकल्पग्रस्तांसाठी मनसे मैदानात

न्हावा-शिवडी सिलिंक प्रकल्पग्रस्तांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात



   
अनंत नारंगीकर 
       जेएनपीटी : न्हावा शिवडी प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे उलटुन गेली असताना देखील येथील स्थानिक भूमिपुत्र, मच्छिमार यांना आश्वसित केलेल्या मागण्यांची पूर्तता झाली नव्हती. शेकडो प्रकल्पग्रस्त मच्छीमारांच्या तक्रारी मनसे कडे आल्यानंतर दि.१८/११/२०२० रोजी मनसेच्या वतीने धडक मोर्चा आयोजित केला होता. 

       प्रकल्पग्रस्त मच्छिमार बांधवाना त्वरित नुकसानभरपाई मिळावी. तसेच अपात्र ठरविलेल्या ६७४२ मच्छीमार बांधवांना परत आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रोजेक्ट साईटवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करणे खिडकी स्थापन करणे भाग पडले. मनसे नेते मा. आमदार नितीन सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत  यांच्या नेतृत्वाखाली तसेच मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष. अक्षय काशीद यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या सर्वच समस्या निराकरण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली असुन शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला नुकसानभरपाई मिळेपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील असे जाहीर मत मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत  यांनी मांडले.

Comments