अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
पोलिसांसमवेत अलिबागकडे रवाना
मुंबई : रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती, या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनल च्या स्टुडीओ च्या इंटेरियर डिझाईन चे काम केले , यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते , परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती , तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे , या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment