माथेरान मिनिट्रेन पर्यटकांच्या सेवेत
गणेश पवार
कर्जत : कोविड काळात माथेरानसह मिनिट्रेन बंद झाल्यानंतर तब्बल 8 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी मिनिट्रेन ही पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी नेरळ हुन फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसह मिनिट्रेन माथेरानकडे रवाना झाली. आठ वाजता ही ट्रेन जुम्मापट्टी स्टेशन वर येताच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही ट्रेन नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान येणे अपेक्षीत होते मात्र ही ट्रेन तब्बल चार तास उशिराने म्हणजे एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान माथेरान रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्यामुळे सकाळच्या फेरीमध्ये जे पर्यटक अमनलॉज स्थानकात जमा होते त्यांचा पुरता हिरमोड झाला. असे असताना काही पर्यटकांचा उत्साह वाढत होता मिनिट्रेन मध्ये बसण्याहेतु चार तास वाट पाहिली व दुपारी मिनिट्रेन येताच त्या ट्रेन मध्ये बसून मिनिट्रेन सफारीचा पुरेपूर आनंद घेतला.दोन फेऱ्या माथेरान स्थानक आणि दोन फेऱ्या अमन लॉज या एकूण चार फेऱ्यांमध्ये 79 प्रवाशांनी प्रवास केला मात्र या मिनिट्रेन च्या सुरू होण्यामागे येथील स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment