आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे यांना मातृशोक
वार्ताहर
खारी-रोहा : रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावचे रहिवासी उपक्रमशील आदर्श शिक्षक तथा पत्रकार नंदकुमार मरवडे यांच्या मातोश्री शांतीबाई विठोबा मरवडे (८२) यांचे बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
अतिशय प्रेमळ शांत मन मिळवू स्वभावाच्या असल्याने सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या तसेच सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिक कार्याची विशेष आवड असणाऱ्या शांतीबाई मरवडे या सर्व आप्तस्वकीय, सगे-सोयरे यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या. वारकरी सांप्रदायाचे पाईक असल्याने आपल्या हयातीत त्यांनी अनेकदा आळंदी व पंढरपूर या पायी वाऱ्या नित्यनियमाने केल्या होत्या. बदलत्या काळानुसार शिक्षणाचे महत्त्व अधिक जाणून असल्याने त्यांनी अतिशय काबाडकष्ट करून आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रचलित नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करीत अंत्यविधी करण्यात आले.
या समयी अध्यात्मिक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र. दि. २७ नोव्हें. तर अंतिम धार्मिकविधी सोम. दि. ३० नोव्हें. २०२० रोजी राहत्या निवासस्थानी होणार असून याप्रसंगी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप मारुती महाराज कोलटकर यांची सकाळी १० ते १२ या वेळेत प्रवचन सेवा होणार आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली.
Comments
Post a Comment