रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे व सुचना नसल्याने अपघाताची शक्यता
सलीम शेख
माणगाव : तालुक्यात असलेल्या मुख्य व दुय्यम रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गतिरोधक बसविलेले आहेत. अनेक गावांच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच अति रहदारीच्या ठिकाणी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यांवर गतिरोधके बसविलेली आहेत. मात्र या गतिरोधकांमुळे अपघात होण्याची संभावना निर्माण झाली असून या गतिरोधकांची माहिती देणारे फलक व गतिरोधक असलेली पांढऱ्या पट्ट्यांची निशाणी नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुरुन न दिसणारे हे गतिरोधक अचानक समोर येत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अचानक ब्रेक मारावे लागत आहेत. सोयीसाठी बसविलेले हे गतिरोधक वाहनचालकांची गैरसोय करीत असून वाहनांचेही नुकसान होते आहे. तसेच वेगावर नियंत्रण नसल्यास या गतिरोधकांवर अपघात होण्याची शक्यता आहे.
Advt.
Comments
Post a Comment