ग्रामपंचायत निवडणुका जाहीर; महाविकास आघाडीची दुसरी परीक्षा!
मुंबई : विधानपरिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर
राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी होणार मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.दरम्यान, १४ हजारांवर ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलंच तापणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील ही दुसरी लढत ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला होता. त्यानंतर आता ग्रामीण महाराष्ट्रात कोण बाजी मारतं, हे या निवडणुकांच्या निकालांतून कळणार आहे.
Comments
Post a Comment