माणगावात शेकापच्या पुढाकाराने प्रातिनिधिकस्वरूपात बंद यशस्वी
सलीम शेख
माणगांव: केंद्र सरकारने लागू केलेल्या नविन कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. हा बंद माणगावात शेकापच्या पुढाकाराने व विविध संघटनांच्या सहकार्याने प्रातिनिधिक स्वरूपात यशस्वी करण्यात आला. माणगाव बाजारपेठेत शेकाप कार्यकर्त्यांनी व सहकारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११:३० वा. एकत्रित येत मोर्चा काढून दुकानदारांना काही काळ आपली दुकाने बंद ठेवा असे सांगितले. या बंद बाबत माणगावमधील व्यापाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना एकदिवस अगोदर देण्यात न आल्याने बहुतांशी व्यापारांनी पहाटेपासूनच आपली दुकाने उघडली होती. रात्री उशिरा शेकापच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बंद ठेवण्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांचीअडचण झाली. या कार्यकर्त्यांनी सकाळी ११:३० वा. एकत्रित येऊन मोर्चा काढून सहकारी संघटनांच्या मदतीने तासभर माणगाव बाजारपेठ बंद ठेवली. त्यानंतर तासाभराने पुन्हा एकदा माणगाव बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यात आली.
शेकापचे युवा नेते निलेश थोरे यांनी मोर्चेकरांना संबोधित करताना सांगितले कि, केंद्र सरकारने देशपातळीवर राबवलेल्या अन्यायकारी व शेतकरीविरोधी कृषीकायद्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात असंतोष आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व शेकाप जेष्ठ नेते अस्लम राऊत यांच्या मार्गदर्शनाने व तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव शहरामध्ये सदर मोर्चा काढण्यात आलेला असून माणगाव व्यापारी असोसिएशनने अगदी मोलाचे सहकार्यकरून प्रातिनिधीक स्वरूपाचा पण कडकडीत बंद पाळल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले तसेच मोर्चाला उपस्थित राहून पाठींबा देणाऱ्या भारत मुक्ती मोर्चा, मुस्लिम मोर्चा व समविचारी संघटनांचे देखील अभिनंदन केले व जोपर्यंत केंद्रसरकार हा अन्यायकारी कायदा मागे घेतनाही तोपर्यंत शेकाप मुद्दा लावून धरेल असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यापारी असोसिएशनतर्फे लक्ष्मण दळवी यांनी अध्यक्ष गिरीश वडके, पदाधिकारी रमेश जैन,बशीर करेल इ. सोबत उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे भारतमुक्ती मोर्चा तर्फे राकेश मोरे यांनी मार्गदर्शनकेले. सदरचा मोर्चा अत्यंत नियोजनबद्धपद्धतीने आखणी करून सुरळीत पार पडला. मोर्चाला मोठ्या प्रमाणावर तरुणवर्गाबरोबरच प्रामुख्याने अजयउभारे, नंदकुमार डवले, प्रदीप लांगे, मारुतीसांगले,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment