उरणमध्ये बंद यशस्वी

उरणमध्ये बंद यशस्वी

   



घन:श्याम कडू
         उरण : शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरात आज ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला होता. त्याला उरणमध्ये उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत बंद यशस्वी झाला आहे.
      उरण शहरातील बाजारपेठ अत्यावश्यक सेवा सोडून बंद राहीली.  शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आनंद नगर जमा होऊन मानवी साखळी रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या, जय जवान जय किसान, मोदी सरकार मुर्दाबाद, जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा  अशा  घोषणांनी  उरण शहर दुमदूमले. 
       उरण आंनदनगर येथून रॅली निघून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते शहरातून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. महात्मा गांधीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सांगता केली. याप्रसंगी सीटूचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील यांनी तीनही कृषी कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत याचे विश्लेषण केले.तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी  संजय ठाकूर यांना सर्व  उपस्थितांचे आभार मानले. पोलिस यंत्रणेने बंदोबस्तात चोख ठेवला होता.
        


     यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सभापती अॅड.सागर कडू, माजी सभापती नरेश घरत, शेकाप तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, सीमा घरत, काका, पाटील,  प्रा. एल. बी. पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज भगत, भावना घाणेकर, पुखराज सुतार,  क्रातीकारी पक्षाचे घन:श्याम पाटील, रमेश ठाकूर, सेनेचे माजी जि.प.सदस्य संतोष ठाकूर,भावना म्हात्रे, जे.पी.म्हात्रे. कॉंग्रेसचे तालूका अध्यक्ष जे. डी. जोशी, मिलींद पाडगावकर, माजी जि. प सदस्य विनोद म्हात्रे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  कॉम्रेड एम. आर. म्हात्रे, सीटूचे शशी यादव, सतीश खरात राजेंद्र फडतरे,हिरामण पाटील, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील, रजनी पाटील,उषा म्हात्रे किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे, विष्णू मोहीते  डी.वाय.एफ. आय.चे संतोष ठाकूर, दिनेश म्हात्रे, रवी कासूकर यांनी या आंदोलनात कार्यकर्त्यांना संंघटीत करून भारत बंद मध्ये आपला सहभाग नोंदविला.

Comments