कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पायी वारी दिंडी सोहळा रद्द
नंदकुमार मरवडे
खांब-रोहे : पुर्वापार परंपरेने आळंदी येथे पायी वारीसाठी जाणाऱ्या पायी दिंड्यांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला असून कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर आयोजकांनी पायी वारी दिंडी सोहळाच रद्द केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोरोना महामारीचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या प्रचलित नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करणे गरजेचे असल्याने रोहा तालुक्यातील गुरूवर्य ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर, हभप दळवी गुरूजी, हभप बाळाराम महाराज शेळके व हभप नामदेव महाराज यादव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चालत असलेली स्व. सु. नि. गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी संप्रदाय पायीवारी दिंडी रोहा व गुरूवर्य हभप नारायण महाराज दहिंबेकर , हभप नारायण महाराज महाबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेली
श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ पायी वारी दिंडी संभे-रोहा
तसेच गुरूवर्य ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेली कोकण दिंडी वारकरी सांप्रदाय पायीवारी दिंडी रोहा या रोह्यातून आळंदीकडे जाणाऱ्या पायी वारी दिंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून जाणाऱ्या पायी चालत वारी दिंडी रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. 'खबरदारी हीच आपली जबाबदारी' याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी तातडीची उपाय योजना तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सदरहू रायगड जिल्ह्यातील दिंडी चालकांनी पायी वारी दिंडी रद्द करण्याचे कठोर निर्णय घेऊन शासकीय नियमांचे पालन केले आहे.
Comments
Post a Comment