उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची शिकार
वार्ताहर
जेएनपीटी : उरण तालुक्यातील डोंगर कपारीत वास्तव करणाऱ्या वन्य प्राण्याची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात नूकताच पुनाडे धरण परिसरात वावरणाऱ्या, बागडणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करण्याची दुदैवी घटना घडली. त्यामूळे या परिसरातील राष्ट्रीय पक्ष्यांचेच (मोरांचे) अस्तित्व धोक्यात येते की काय अशी भिती प्राणी प्रेमी व्यक्त करत आहेत. परंतु सततच्या शिकार प्रकरणी उरणचे वनक्षेत्रपाल सुशांत कदम हे ठोस भूमिका बजावत नसल्याने वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील रायगड जिल्ह्यातील डोंगर कपारीत वसलेल्या उरण तालुक्याला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच निसर्गाचे वरदान प्राप्त झाले आहे. अशा या तालुक्यात विविध जाती धर्माच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तसेच परिसरात पसणाऱ्या डोंगर कपारीत विविध जातींचे पक्षी आणि वन्या प्राणी वास्तव्य करत आहेत. अशा या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणासाठी महसूल, वन विभागाच्या कुपा आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात खाजगी व वन जमिनीतून दगड आणि मातीचे उत्खनन सुरू आहे.
परंतु उत्खनन करण्यात येत असलेल्या खाजगी, वन जमिनीवर पुन्हा वृक्ष संवर्धन केले जात नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. त्यामुळे विविध जातींच्या वन्य प्राण्यांची, पशु-पक्षांची आश्रयस्थाने नष्ट होत आहेत. याचा फायदा उठवत शिकारी रात्री-अपरात्री वन्य प्राण्यांची व पक्षु पक्षांची शिकार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अशा शिकारीमुळे या परिसरात आढळून येणाऱ्या वाघ, बिबट्या, हरण यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सध्या याच शिकाऱ्यांनी डोंगरात आढळून येणाऱ्या डुक्कर, भेकर, ससा या प्राण्यांच्या शिकारीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अशा शिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा उरण वन विभागाचे अधिकारी हे अशा शिकाऱ्यांची पाठराखण करत आहेत.
त्यात अलिबाग येथील उप वनसंरक्षक अधिकारी यांनी सुशांत कदम या अकार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती ही उरण वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून केली. त्यांचा फायदा या परिसरातील माती, दगड माफिया आणि शिकाऱ्यानी उठवत विविध जातींच्या पशु पक्ष्यांची, वन्य प्राण्यांची तसेच देशाचे राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराची शिकार करण्याकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे नूकत्याच पुनाडे धरणाजवळ आढळून आलेल्या मोराच्या शिकारीतून समोर येत आहे. त्यामूळे आज या डोंगर परिसरात आढळून येणाऱ्या आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तरी अशा शिकाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या व वारंवार होणाऱ्या शिकारीच्या घटनांना जबाबदार धरून उरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत कदम यांची ही सखोल चौकशी करून त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणी पक्षी मित्र करत आहेत.
वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय

ADVT
Comments
Post a Comment