कोरोनाच्या महामारीत उरणच्या पेशंटची ऑक्सिजन अभावी अवेहलना

                                                                                                                संग्रहित

घन:श्याम कडू    
           उरण : कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होऊ लागला आहे. सर्व हॉस्पिटल फुल्ल झाले आहेत. तसेच उरणमध्ये ऑक्सिजन नसल्याने पेशंटची अवेहलना होताना दिसत आहे. तरी अधिकारी वर्गानी याची त्वरित खबरदारी घेऊन उपाययोजना करावी अन्यथा उरणमध्ये बळींचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेएनपीटी प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.
          देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये बळी जाणाऱ्यांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोनाचे पेशंट एवढे झाले आहेत की हॉस्पिटलमध्ये पेशंट ठेवायला जागाच शिल्लक राहिली नाही एवढी भयानक परिस्थिती ओढावली आहे.  उरणमध्ये ही याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यात दम लागणारे पेशंट जास्त आहेत. परंतु त्यांना ऑक्सिजन उरणमध्ये नसल्याने पेशंट पनवेलला पाठवावे लागत आहेत. पनवेललाही ऑक्सिजन पुरवठा देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध  नाहीत. त्यामुळे उरणच्या पेशंटला रुग्णवाहिकेतून पनवेलवरून परत उरणला पाठविले जाते. असाच एक पेशंट बेड ऑक्सिजन नसल्याने परत उरणला पाठविण्यात आले आहे. जर पेशंटला ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर उरणमध्ये बळींचा आकडा आजचा ४ असला तरी तो यापुढे वाढण्याची शक्यता आहे.
           उरणला जेएनपीटीने बेडची व्यवस्था केली परंतु त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्स, ऑक्सिजनचा पुरवठा  व पेशंटला पिण्यासाठी व अंघोळीसाठी गरम पाणी आदी सुविधांची गरज आहे. ही सर्व व्यवस्था करणे अनिवार्य  असतानाही जेएनपीटी प्रशासनही जबाबदारी टाळत असल्याचे बोलले जात होते. याबाबत संतोष पवार यांनी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांत अधिकारी नवले, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याशी संपर्क साधून येथील परिस्थितीचे गांभीर्याने विचार करण्यात यावा अन्यथा ऑक्सिजन अभावी पेशंटचा मृत्यू होऊन बळींचा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेऊन जेएनपीटीला या सर्व सोयी देण्यास बंधनकारक करण्यात यावे अन्यथा कोरनाच्या या महामारी संकटात ऑक्सिजन अभावी उरणच्या पेशंटची अवहेलना होऊन त्यांना आपला जीव गमविण्याची वेळ येईल अशी भीती संतोष पवार यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांच्याबरोबर चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर चेअरमन सेठी यांनी याची आपण लवकरात लवकर सकारात्मक दृष्टीने पूर्तता करू असे सांगितले आहे. त्यामुळे सदर गोष्टींची पूर्तता कधी होते याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments