प्रतिबंधित क्षेत्रातही दुकाने सुरूच
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या नागोठणेतील शिवाजी चौकात उघडी असलेली दुकाने (छाया / महेंद्र म्हात्रे)
महेंद्र म्हात्रेनागोठणे : शहरात आज एक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असल्याने शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यात अजून यश आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती २९ वर्षीय असल्याचे सांगण्यात आले. याच भागात काही दिवसांपूर्वी एकाच घरातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण लागल्याने हा भाग कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून बंद करण्यात आला असल्याने कामानिमित्त दररोज बाहेर जाणाऱ्या नागरिकांसह महिला वर्गाला पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, शहराच्या शिवाजी चौक भागात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून बहुतांशी दुकाने तेव्हापासून बंद करण्यात आली आहेत. मात्र, चारही बाजूला लोखंडी गेट टाकून बंद करण्यात आलेल्या भागात अनेक दुकाने दिवसभर उघडी राहात असल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे नक्की काय, असा सवाल त्या निमित्ताने विचारला जात आहे.
Comments
Post a Comment