उरण तालुक्यात पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव ; ३ पोलिसांना लागण

उरण तालुक्यात पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव ; ३ पोलिसांना लागण

 
घन:श्याम कडू
          उरण : उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आता तर शासकीय यंत्रणेमध्येही कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी उरण पोलीस ठाण्यात आरोपी पॉझिटिव्ह आढळला होता तर आता न्हावा-शेवा पोलीस ठाण्यातील २ पोलीस तर  न्यायालयातील १अंमलदार पोलीस पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.
          उरण परिसराला कोरोनाचा विळखा घट्ट आवळला जात असून जिथे जागा मिळेल तिथे लागण होऊ लागली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचा आकडा वाढू लागला आहे. त्याचबरोबर बळींचाही आकडा वाढत चालला आहे. यामुळे उरणच्या जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे.
        उरणला कोरोनाचा प्रसार होत असतानाच आता शासकीय यंत्रणेलाही कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. उरण पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी खून प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली होती. त्यातील १ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे काही पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील २ व न्यायालयातील १ अंमलदार असे ३ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे पोलीस यंत्रणेत भितीचे वातावरण पसरले आहे.
         कोरोनाचा प्रादुर्भाव पोलीस कर्मचाऱ्यांना होऊ लागल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्याचबरोबर बळींचाही आकडा वाढत आहे. यामुळे उरणची जनता चिंतेत पडली आहे. शासकीय यंत्रणेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर जनतेची सुरक्षा पूर्णपणे धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी शासकीय यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Comments