रायगडात १६ ते २४ पर्यंत कडक लॉकडाऊन!

रायगडात १६ ते २४ पर्यंत कडक लॉकडाऊन!


प्रतिनिधी 
       अलिबाग : जिल्ह्यातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याकरिता पुन्हा एकदा कडक लोकडाऊन जारी करण्यात आले आहे. १५ जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 24 जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसंर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
         रायगड जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दररोज तीनशे ते चारशे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या साडेसात हजारांवर गेली आहे. २१२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून जिल्ह्यात कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. विशेषतः पनवेल तालुक्यात वेगाने होणारा कोरोनाचा फैलाव चिंताजनक आहे. कंपन्या असलेल्या अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन स्वतःहून लॉकडाऊन करून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आणि जनतेतून होणारी मागणी, यावर चर्चा करण्यासाठी आज (13 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली.
         पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या कालावधीत दारू विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. चिकन, मटण, मासे विक्री बंद राहणार आहे. मेडिकल दुकाने पूर्णवेळ सुरु राहणार आहेत तर दूध विक्रीही सुरु राहणार आहे. या कालावधीत घरपोच सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी ज्या नगरपरिषदांनी बंद पळाले आहेत त्यांनीही या लॉकडाऊन मध्ये सहभागी व्हायचे असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. 

Comments