माणगाव तालुक्यातील १०३ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी

माणगाव तालुक्यातील १०३ कोरोनाग्रस्त  रुग्ण बरे होऊन घरी

सध्या बाधित रुग्णांची संख्या ५८ वर


सलीम शेख
          माणगाव : तालुक्यात आतापर्यंत ३५ गावातून १६३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून त्यापैकी १०३ रुग्ण स्वतः च्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले असून दोघांचा मृत्यू होऊन सध्या तालुक्यात बधितांची संख्या ५८ असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार, दि. १० जुलै २०२० रोजी सायंकाळी देण्यात आली.
          माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून कोरोनाचे रुग्ण  आढळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तालुक्यातील ३५ गावांतून कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. माणगाव नगरपंचायत हद्दीत लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असून मोर्बा, निजामपूर या गावांतून लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. माणगाव नगरपंचायत हद्दीत तसेच इंदापूर व मोर्बा याठिकाणी एक,दोन दिवस आड कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने येथील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. माणगावात सरकारी कार्यालयातून तसेच घरातून कोरोनाचे आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांना प्रशासन लगेचच क्वारंटाईन करून खबरदारी घेत आहे. तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तालुक्यातील तमाम जनतेने सरकारने केलेल्या सुचनांचे नियमितपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

ADVT

Comments