सरस्वती म्हस्के यांचे निधन
वार्ताहर
खांब-रोहे : रोहे तालुक्यातील मुठवली बु. गावच्या रहिवासी असणाऱ्या सरस्वती गंगाराम म्हस्के (७५) यांचे शुक्रवार, दि.१० जुलै रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
सरस्वती म्हस्के या अतिशय प्रेमळ, शांत स्वभावाच्या होत्या. तसेच सर्वांशी आपुलकीने वागायच्या. सध्या कोरोनाने जगभर थैमान माजविले असल्याने सामाजिक सुरक्षिततेचे दृष्टीने सरस्वती म्हस्के यांच्या अंत्यविधीसाठी म्हस्के परिवारातील सदस्य, आप्तस्वकीय व मुठवली ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अंत्यविधी पार पाडला.
सरस्वती म्हस्के यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना,जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी रविवार, दि.१९ जुलै तर अंतिम धार्मिकविधी बुधवार, दि.२२ जुलै रोजी मुठवली येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
ADVT
Comments
Post a Comment