रोह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
८ नव्या रुग्णाची नोंद
केशव म्हस्के
खारी-रोहा : आज रोहा तालुक्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली असून जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या १६८ वर पोहचली असून रोहा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे.
. नागरिकांच्या मनात भीती वाढली आहे. दक्षता म्हणून चार दिवस कंपन्या बंद ठेवण्यात आल्या असून रोहा, धाटाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याने कोणीही घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून सार्वजनिक ठिकाणी न जाता घरीच राहिल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार कविता जाधव यांनी केले आहे.
तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज शनिवार दि. ४ जुलै रोजी कोरोनाचे ८ नवे बाधित रुग्ण आढळून आले, आहेतः तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १६८ वर पोहोचली आहे. यापैकी ५८ जण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत १०८ रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.
Comments
Post a Comment