अलिबाग तालुक्यात अवघे 6 रुग्ण; कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे
वार्ताहर
अलिबाग : गेल्या आठवडाभरापासून अलिबाग तालुक्यातील कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.सोमवारी तालुक्यात अवघे 6 रुग्ण आढळून आले.यामुळे तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या 4,699 अशी झाली.त्यातील 4,366 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान,सोमवारी 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.आता प्रत्यक्षात 209 जणांवर उपचार सुरु आहेत.सुदैवाने सोमवारी कुणीही दगावले नाही.त्यामुळे मृतांची संख्या 124 अशी जैसे थे राहिली,अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
Comments
Post a Comment