खालापूरात जखमी मेंढपाळ महिलेचा मृत्यू
कंटेनर चालकाला अटक
मनोज कळमकर
खालापूर : मद्यधुंद कंटेनर चालकाने धङक दिलेली मेंढपाळ महिला बनाबाई मस्को ठोंबर (वय 65, रा. मुटी मोडवे ठोंबरमाळ ता. बारामती जि. पुणे ) हिचा मृत्यू झाला असून पोलीसानी चालक ऊमेश इश्वर दहिफळे (वय 23, रा. कोळगांव पो. किनगांव ता. अहमदपुर जि. लातुर) याला अटक केली आहे. मंगळवारी संध्याकाळी जुन्या मुंबई पूणे महामार्गावर कलोते गावानजीक मेंढ्याच्या कळपात कंटेनर घुसला होता. चालक ऊमेशने अतिमद्यसेवन केल्याने कंटेनर अनियंञित होवून अपघात घङला होता. या अपघातात मेंढपाळ महिला बनाबाई गंभीर जखमी झाली होती. चार मेंढ्या दगावल्या होत्या तर पंधरा जखमी झाल्या होत्या.
बनाबाईला एमजीएम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. चालक ऊमेश दहिफळेला पोलीसानी अटक केली असून खालापूर पोलीस ठाणे मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक अमित सावंत हे करीत आहेत.
Comments
Post a Comment