केअर पॉईंट हॉस्पिटलमधून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे पलायन

 केअर पॉईंट हॉस्पिटलमधून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे पलायन

 

   
घन:श्याम कडू
      उरण : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णानी सायंकाळी पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वीसुद्धा एक पॉझिटीव्ह रुग्णालयातून पलायन केले होते.
   उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एक कोरोना पॉझिटीव्ह रुगणांनी हॉस्पिटल मधून काल सायंकाळी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
       यापूर्वीसुद्धा आणखीन एका  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पळून जाण्याचा घटना घडली होती. काल अशाच प्रकारे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण रुग्णालयातुन पळून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रशासन यंत्रणेकडे विचारणा केली असता कोणीही माहिती देत नाही. मात्र कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पळालाच्या घटनेला रुग्णालयातील अधिकारी वर्ग याला दुजोरा देत असून त्याचा तपास सुरू असल्याचे सांगतात.
    केअर पॉईंट हॉस्पिटलमधून कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पळून गेल्याची घटना घडल्याने उरणच्या जनतेत भीतीचे सावट पसरले आहे.

Comments