काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही - राज ठाकरे

काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही - राज ठाकरे



       मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून देशात संताप व्यक्त केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.

          उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

         हाथरसमधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

Comments