मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांना आमदार महेश बालदी यांचा पाठिंबा
वार्ताहर
जेएनपीटी : मराठा आरक्षणाला सर्वौच्च न्यायालयात स्थगिती दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये असंतोष असून ठिकठिकाणी आंदोलने सूरू आहेत. न्यायालयाच्या स्थगितीमुळे मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा व सवलतींचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान राज्य सरकारच्या विविध स्पर्धा परिक्षा व नोकर भरती सूरू झाल्याने मराठा समाजाच्या तरूणांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता नाही. मराठा आरक्षणा संदर्भात स्थगिती उठवण्यासंदर्भात आणि विधीमंडळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. त्याबाबत जाहिर पाठिंबा दिल्याचे पत्र त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना दिले आहे.
Comments
Post a Comment