रायगडमधील नाते गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड
आमदार निरंजन डावखरे यांचे प्रयत्नप्रतिनिधी
अलिबाग : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील नाते गावाची निवड झाली आहे. भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून एकमेव नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेचा समावेश आहे. त्यानुसार राज्यांच्या पथ निर्देशित संस्थेमार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ऊर्जा बचतीसाठी नवीन ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाची प्रायोगिक तत्वावर तुलना केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून सध्या उर्जेवर आधारित नवीन परिकल्पना साकारल्या जात असून, त्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी रायगड जिल्ह्यातील नाते गावाची आदर्श ग्राम करण्यासाठी निवड केली आहे. या गावाचा आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेत समावेश व्हावा, यासाठी आमदार डावखरे यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. त्याला यश आले. या निर्णयामुळे गावातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्रे, ग्राम सचिवालये आणि इतर शासकीय कार्यालये सोलार केली जाणार आहेत. यापूर्वी नाते गावाला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी निरंजन डावखरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Comments
Post a Comment