रायगड जनोदयच्या 'तेजोराधना' दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रतिनिधी
नागोठणे : रायगड जनोदयच्या 'तेजोराधना' या दिवाळी अंकाचे प्रकाशन नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, रायगड जनोदयचे संपादक मंगेश पत्की, सह संपादक महेंद्र म्हात्रे उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सरपंच मिलिंद धात्रक म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांनी पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी जपत समाजप्रबोधनाचे चांगले काम केले. पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून ते जपण्याचं प्रामाणिक काम पत्रकार करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
Comments
Post a Comment