नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे हितेश घरत
घन:श्याम कडू
उरण : नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे हितेश घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच हितेश घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उपसरपंच प्रीती तांडेल यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आज सरपंच आरती चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी शिवसेनेचे हितेश घरत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपसरपंच पदी हितेश घरत यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी जि. प. सदस्य विजय भोईर, सरपंच आरती चौगुले, ब्लु स्टार सिक्युरिटीचे संचालक विकास भोईर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश बंडा, रवी वाजेकर, जगदीश पाटील, सुमती बंडा, लीना चोगले, अलका वाघ, आकाश मढवी, समाधान भोईर, प्रीती तांडेल, भुपेंद्र कडू, दमयंती पाटील, चैताली पाटील, मयुरी पाटील, ग्रामविकास अधिकारी किरण केणीआदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment