माणगाव नगरपंचायत निवडणूक
–––––––––––––––––––––––––
विविध पक्षाचे हौशे-नवशे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार
सलीम शेख
माणगाव: नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२१ मध्ये होणार असून या निवडणुकीसाठीनगरसेवक पदाचे दि.२७ नोव्हेंबर रोजी आरक्षणपडल्यानंतर नगरसेवक पदाची उमेदवारी करण्यासाठीविविध पक्षाचे हवशे, नवशे, गुडघ्याला बाशिंगबांधून तयार आहेत. या निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? हि एकच चर्चा सध्या माणगाव नगरीत नाक्या-नाक्यावर सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत व नगरपंचायतींपैकी माणगाव नगरपंचायत एक ओळखली जाते. माणगाव हे दक्षिण रायगडमधील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर असलेले तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या गावाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. या गावाचे नगरसेवकआपण व्हावे असे अनेकांना वाटत आहे. निवडणूक दूर असल्यापर्यंत उमेदवारी करण्यासाठी कोणीच इच्छा प्रकट करीत नाही. पण निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर मग काहीही होऊ दे आम्ही कर्ज काढू, जागा विकू मात्र यावेळी उमेदवारी करणारच असा चंग अनेकजण माणगावात बांधताना दिसत आहेत.त्यातच नगरसेवक पदाचे आरक्षण पडल्यानंतर नगरपंचायतीच्या १७ वार्डांतून विविध पक्षाचे कार्यकर्ते पक्ष नेतृत्व मलाच पक्षातर्फे अधिकृत उमदेवारी देणार असे बोलत आहेत. तर काही जण अपक्ष उमेदवारी करण्याच्या पावित्र्यात असून काहीजण माणगावच्या यानिवडणुकीत बंडखोरी करणार हे देखील खरे आहे. माणगाव नगरपंचायतीवर सध्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून पडलेल्या आरक्षणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचे पत्ते कट झाले असल्याने हे सर्वजण आपल्या त्या वार्डात योग्य त्या उमेदवाराची चाचपणी करीत आहेत. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना व अन्य पक्ष लढले होते. तीच परिस्थिती यावेळेसही वाटत आहे. मात्र दस्तुरखुद्द रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्येक निवडणुकीत आपला अनुभव पणास लावून नाराजांना शांत करण्यात यश मिळविले आहे. रायगडच्या राजकारणातील धुरंदर नेते म्हणून खा. तटकरे यांची ख्याती आहे. कोणाला जवळ करायचे, कोणाला थांबवायचे व निवडणूक कशी जिंकायची यात ते माहीर आहेत. हे कोणीच नाकारू शकत नाही. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. यांच्या पक्ष नेतृत्वांनी यापुढे आपसात कोणाचा पक्ष प्रवेश कोणत्याही पक्षाने न घेता येणाऱ्या सर्व निवडणूक महाविकास आघाडी मार्फत लढू असे सांगितले आहे.तसे सूचक विधान खा.सुनील तटकरे यांनी रायगडात केले आहे.राज्यातील महाविकास आघाडीची असणारी सत्ता पाहता माणगाव नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी अबाधित ठेवण्यासाठी खा.सुनील तटकरे यशस्वी होतात का?याकडेही सर्वांचे लक्ष आहे.मात्र आघाडीतील शिवसेना,काँग्रेस आय यांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली असून शेकापही काही वार्डांतून निवडणूक लढविणार असून भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यावर कोणते चित्र समोर येईल याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.
Comments
Post a Comment